नगरपरिषद निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

पुणे, दि. 20 : जिल्ह्यात ज्या ठिकाणी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्या मतदारसंघांमध्ये शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार बारामती, दौंड, फुरसुंगी–उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या मतदारसंघांमध्ये ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे यांना याबाबत कळवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामानिमित्त त्या त्या मतदारसंघाबाहेर असतील, त्यांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी मतदारांनी नचुकता मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button