विभागीय आयुक्तांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी; १ जानेवारी अभिवादन कार्यक्रमासाठी तयारीचा आढावा

पुणे, दि. १७ : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरात १ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. वाहनतळ, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे ग्रामीण पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टी निबंधक विशाल लोंढे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान वाहनतळ व इतर व्यवस्थांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांना भेट देऊन तयारीची पडताळणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सुकर वाहतूक आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button