पुणे महापालिका निवडणूक 2025: इच्छुक उमेदवारांसाठी नाहरकत प्रमाणपत्रासाठी एकखिडकी कक्ष व ऑनलाइन सुविधा सुरू

सुरू
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना थकबाकी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) सुलभ व जलद मिळावे, यासाठी पुणे महानगर पालिकाकडून एकखिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष सावरकर भवन, पहिला मजला येथे कार्यान्वित असून, येथे सर्व विभागांची नाहरकत एकत्रितपणे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महानगरपालिकेने यासाठी संगणक प्रणाली विकसित केली असून nocelection.pmc.gov.in या संकेतस्थळावरून इच्छुक उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करून ऑनलाइन अर्ज दाखल केल्यास कमीत कमी वेळात नाहरकत प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच दाखल करावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button