
पुणे दि.18 : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे आज पहाटे रात्री 1.30 वाजता नोएडा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय शिल्पकलेच्या विश्वात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे.
राम सुतार यांनी भारतातील अनेक ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या शिल्पकृती घडवून शिल्पकलेला जागतिक व्यासपीठावर नेले. विशेषतः जगातील सर्वात उंच पुतळा असलेला Statue of Unity (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) ही त्यांची अजरामर कलाकृती मानली जाते. त्यांच्या कलाकृतींमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहास आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम दिसून येतो.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कला, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. देशाच्या कला परंपरेला जागतिक ओळख देणाऱ्या या महान कलाकाराला आज भारताने गमावले आहे.आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.