२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २२ जानेवारीदरम्यान; ऑनलाईन नोंदणी सुरू

पुणे, दि. 17 : पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) २०२६ हा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती महोत्सवाचे संचालक, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, सबिना संघवी, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे व अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते.

महोत्सव पीव्हीआर – पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर – युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय – लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा १० स्क्रीनवर होणार आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी कॅटलॉग फी ८०० रुपये असून ऑनलाईन नोंदणी www.piffindia.com
वर सुरू आहे. ५ जानेवारीपासून सर्व थिएटर्समध्ये सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध राहणार आहे.

यंदाच्या महोत्सवाची थीम महान दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी अशी आहे. जागतिक व मराठी स्पर्धात्मक विभाग तसेच ग्लोबल सिनेमा या विभागांतून सुमारे १४० चित्रपट दाखवले जाणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात (ओपनिंग फिल्म) La Grazia (इटली) – दिग्दर्शक Paolo Sorrentino यांच्या चित्रपटाने होणार असून, समारोप (क्लोजिंग फिल्म) Father Mother Sister Brother – दिग्दर्शक Jim Jarmusch यांच्या चित्रपटाने होणार आहे.

जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागासाठी १०३ देशांमधून ९००हून अधिक चित्रपट प्राप्त झाले होते. त्यातून १४ चित्रपटांची अंतिम निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून परीक्षण होऊन ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (१० लाख रुपये) दिला जाणार आहे.

जागतिक चित्रपट स्पर्धेत निवडलेले १४ चित्रपट

A Sad and Beautiful World – दिग्दर्शक: Cyril Aris

Adam’s Sake – दिग्दर्शक: Laura Wandel

All That’s Left of You – दिग्दर्शक: Cherien Dabis

As We Breathe – दिग्दर्शक: Seyhams Altun

Blue Heron – दिग्दर्शक: Sophie Romvari

Lost Land – दिग्दर्शक: Akio Fujimoto

Milk Teeth – दिग्दर्शक: Mihai Mincan

Nino – दिग्दर्शक: Pauline Loquès

Rebuilding – दिग्दर्शक: Max Walker-Silverman

Silent Friend – दिग्दर्शक: Ildikó Enyedi

Spying Stars – दिग्दर्शक: Vimukthi Jayasundara

The Elysian Field – दिग्दर्शक: Pradeep Kurba

This Is My Night – दिग्दर्शक: Jafra Younis

White Snail – दिग्दर्शक: Elsa Kremser, Levin Peter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button