राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

पुणे, दि. 16 : निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या महापालिका निवडणुकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 3 जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.

आरक्षणाच्या दृष्टीने पाहता, एकूण 2869 जागांपैकी 1442 जागा महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय 341 जागा अनुसूचित जाती (SC), 77 जागा अनुसूचित जमाती (ST) आणि 759 जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button