महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे पुण्यातील प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द

पुणे, दि. १५ : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द करण्यात आला आहे.

हा प्लेसमेंट ड्राइव्ह सकाळी १० वाजता, २८९, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, समर्थ पोलीस स्टेशनसमोर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार होता. मात्र आज, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button