केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस ‘संघर्षदिन’ म्हणून देशभर साजरा होणार

पुणे, दि. 14 — रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा येत्या 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असून, हा दिवस रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर ‘संघर्षदिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
संघर्षनायक रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील प्रत्येक भागात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरे, रुग्णांना फळवाटप, गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच थंडीच्या काळात गरिबांना चादर वाटप आदी लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन Republican Party of India (Athawale) च्या वतीने पुणे शहर कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले.
यावेळी पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे, पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, तसेच शैलेश चव्हाण, श्याम सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button