जुन्नर वन विभागात विक्रमी कारवाई: कमी वेळेत 68 बिबटे पकडले; मानव-बिबट संघर्ष नियंत्रणात

पुणे दि. 14 : जुन्नर वन विभागात वाढलेल्या बिबटयांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांना मोठे यश मिळाले आहे. आतापर्यंत 68 बिबटे पकडण्यात आले असून, इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे पकडण्याची ही विक्रमी कामगिरी असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पिंजरे, गस्त, जनजागृती आणि तंत्राधारित उपाय राबवण्यात आले. या मोहिमेत उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्नांचे योगदान असल्याचेही डुडी यांनी अधोरेखित केले.

नुकसानभरपाई व आकडेवारी (2025–26)

मानवी मृत्यू: 5 — ₹65 लाख भरपाई

जखमी नागरिक: 5 — ₹2.18 लाख

जनावरांचा मृत्यू: 1,657 — ₹1.61 कोटी

पीक नुकसान: 17 हेक्टर — ₹9.79 लाख
👉 एकूण भरपाई: ₹2.38 कोटी

व्यापक व्यवस्थापन व जनजागृती

185 बिबट-बछड्यांचे पुनर्मिलन (2020–21 ते 2025–26)

24×7 नियंत्रण कक्ष (टोल-फ्री: 1800 3033)

‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प: पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (शिरूर), आळे-नगदवाडी (जुन्नर), गावडेवाडी (आंबेगाव)

400 प्राथमिक बचाव पथक सदस्य, 400 पिंजरे कार्यान्वित

3,300 नेक-गार्ड, 5 ठिकाणी अनायडर्स मशीन

सौर कुंपण: 150 घरे पूर्ण; 550 घरे प्रक्रियेत

410 सौर दिवे व 410 तंबू मेंढपाळ/ऊसतोड कामगारांना

स्थलांतर व भविष्यातील योजना

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या मंजुरीनंतर जुलै 2024 मध्ये संघर्षक्षेत्रातील 10 बिबट्यांचे स्थलांतर जामनगर येथील बचाव केंद्रात करण्यात आले. पुढील टप्प्यात बिबट नसबंदी, दिवसा वीजपुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स, तसेच 4 नवीन निवारा केंद्रे प्रस्तावित असल्याची माहिती देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button