
मुंबई 14:“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” या दमदार डायलॉगसह रितेश देशमुख पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात धमाल आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. भाऊंचा कडक स्वॅग, पारंपरिक वेशातील नवा लूक आणि तुफान डायलॉग्समुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात धमाल आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. भाऊंचा कडक स्वॅग, पारंपरिक वेशातील नवा लूक आणि तुफान डायलॉग्समुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.
मागील सिझनने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि यंदा “Swag तोच, पण पॅटर्न रितेश भाऊंचा” असणार असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट संकेत मिळतात. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” या वाक्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांच्या उपस्थितीत शूट झालेला हा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो लक्ष वेधून घेतो. पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशात दिसलेले रितेश भाऊ प्रत्येक फ्रेममध्ये वेगळ्याच अंदाजात झळकतात.
आता प्रश्न एकच—घरात कोणाची सलामी गाजणार? कोणाचा नवस पूर्ण होणार? आणि भाऊंचा नवा पॅटर्न नेमका कसा असणार?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.
बिग बॉस मराठी सिझन ६ – ११ जानेवारीपासून, दररोज रात्री ८ वाजता Colors Marathi आणि JioHotstar वर प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या सिझनसाठी सज्ज व्हा!