कोलकात्यात मेस्सीचा दौरा वादात; सॉल्ट लेक स्टेडियममधील अल्प उपस्थितीमुळे चाहते संतप्त

पुणे दि. 13 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी १३ डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला. २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार असलेल्या मेस्सीच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर हजारो चाहते जमले होते.
मेस्सीच्या भारतातील तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात कोलकात्यातून झाली. या दौऱ्यात शाहरुख खान, ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत होती.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियम येथे दाखल झाला. येथे त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळ चालला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. अनेक चाहत्यांनी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहते संतप्त झाले आणि काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button