मुंबईत जगातील सर्वात मोठा GCC प्रोजेक्ट; 45 हजार रोजगारांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबातमी

मुंबई, दि. 12 — महाराष्ट्राला Global Capability Center (GCC) हब बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार असून या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिओ कन्व्हेशन सेंटर येथे झालेल्या बैठकीत सत्या नडेला (CEO, मायक्रोसॉफ्ट), विक्रम आहुजा (CEO, ANSR) आणि अंकुर गुप्ता (ब्रुकफिल्ड) उपस्थित होते. राज्यात गुंतवणूक, GCC विस्तार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सहकार्यावर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील प्रतिभा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरण यामुळे महाराष्ट्र GCC साठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि आर्थिक वृद्धी वेगाने होईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC आणि ऑपरेशन्ससाठी गुंतवणुकीस इच्छुक आहे.

AI सहकार्याला गती

मुख्यमंत्र्यांनी मायक्रोसॉफ्टकडे आगामी गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची विनंती केली असून, सध्या देखील मायक्रोसॉफ्टची भारतामधील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीतून महाराष्ट्राला AI केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Crime AIOS, Marvel आणि AI Co-Pilots

मुख्यमंत्री फडणवीस यांनी Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे सादरीकरण केले. AI च्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणातील हे मॉडेल देशभरासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी “AI Co-Pilots” विकसित करण्यावर चर्चा झाली. महाराष्ट्राने विकसित केलेल्या “Marvel” प्लॅटफॉर्ममुळे सायबर व आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांऐवजी अवघ्या 24 तासांत शोधता येत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान टळत आहे आणि तपास वेगवान झाला आहे.यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अनबलगन तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button