शेतजमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ; महाराष्ट्र शासनाचे ई-मोजणी पोर्टल शेतकऱ्यांसाठी ठरतेय उपयुक्त

पुणे दि. 12 : महाराष्ट्र शासनाने शेतजमीन मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ई-मोजणी व्हर्जन 2.0 पोर्टल सुरू केले असून, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. जमिनीची हद्द निश्चित करणे, वाद निराकरण आणि नोंदवही अद्ययावत ठेवण्यासाठी शेतजमीन मोजणी महत्त्वाची मानली जाते.

जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8A उतारा, फेरफार नोंदी, जमिनीचा नकाशा आणि सहधारकांची माहिती अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्जाची प्रक्रिया दोन प्रकारे केली जाऊ शकते—ई-मोजणी पोर्टलद्वारे ऑनलाइन किंवा तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करून.

ई-मोजणी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नागरिकांना लॉगिन करून मोजणी अर्ज भरावा लागतो, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि फी ऑनलाइन भरावी लागते. फी जमा झाल्यावर मोजणीची तारीख शेतकऱ्यांना ऑनलाइन मिळते.

ऑफलाइन पद्धतीत, शेतकऱ्यांनी तालुका भूमापन कार्यालयातून अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा लागतो.

मोजणीसाठी दोन प्रकार आहेत—

द्रुतगती (एक्सप्रेस) मोजणी: 30 दिवसांत पूर्ण, 2 हेक्टरपर्यंत ₹8,000 फी व अतिरिक्त 2 हेक्टरसाठी ₹4,000

साधी मोजणी: साधारण 60 दिवस कालमर्यादा

अर्ज स्वीकारल्यानंतर सर्वेक्षकांकडून अर्जदार व लगतच्या मालकांना 15 दिवस आधी नोटीस पाठवली जाते. मोजणीच्या दिवशी GIS तंत्रज्ञान वापरून जमिनीची अचूक मोजणी केली जाते व शेवटी अर्जदाराला ‘क’ नमुन्यात हद्दनकाशाची प्रत दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button