
पुणे दि. 12 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वच्छ, अभ्यासू प्रतिमेचे राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षात सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी राज्यमंत्री, वाणिज्य मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. तसेच ते देशाचे 10 वे लोकसभा अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
गेल्या काही वर्षांपासून ते राजकीय जीवनापासून दूर राहात होते. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती आणि संतुलित नेतृत्वशैली यासाठी त्यांचा नेहमीच आदर करण्यात येत असे.
त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर, सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.