सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) ७२ पदांची भरतीपात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : सैनिक कल्याण विभाग आणि अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या एकूण ७२ पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेल्या त्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस प्राधान्य दिले जाणार आहे, जे युद्धकाळात किंवा शांतता काळात सैनिकी सेवेत असताना मृत झाले किंवा अपंगत्व आल्याने नोकरीसाठी अयोग्य झाले आहेत.

या पदांपैकी ३ पदे अपंग संवर्गासाठी राखीव असून किमान 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांच्या गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएनमार्फत पार पडेल.

प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. कोणत्याही अन्य माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. नि., जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button