
पुणे दि. 10 : महाराष्ट्रात गो-रक्षणासाठी संघर्षाची नवी दिशा देत राष्ट्रीय महाकाल सेना, महाराष्ट्र राज्यतर्फे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत लातूर ते मुंबई अशी 450 किमींची “गोमाता राजमाता” पदयात्रा जाहीर करण्यात आली.
या पदयात्रेचा प्रमुख उद्देश संपूर्ण राज्यात गोहत्या बंदीचे कठोर अमलबजावणी, धार्मिक नावाखाली चालविल्या जाणाऱ्या अवैध व्यापार व हॉटेलिंगवर कारवाई तसेच राज्य सरकारसमोर गो-संवर्धनाच्या मागण्या प्रभावीपणे मांडणे हा असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
या पदयात्रेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने हिंदू संघटना, गोप्रेमी युवक-महिला सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय महाकाल सेनेचे म्हणणे आहे की, “गौ-संवर्धन हे केवळ धार्मिक नव्हे तर समाजाच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न आहे.”
संघटनेच्या 7 प्रमुख मागण्या
संपूर्ण महाराष्ट्रात गोहत्या बंदीची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी
धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या मटन-चिकन हॉटेलिंगला तालुक्यातुन दूर करण्यासाठी कार्यवाही
रस्त्यावर अनधिकृतपणे चालणाऱ्या मटन-चिकन दुकाने बंद करावीत
गौहत्या करताना गुन्हे दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
हिंदू देवतांच्या नावाचा वापर करीत चालणाऱ्या उद्योगांवर कारवाई
गो-तस्करी करणाऱ्या वाहनांचे नंबर जाहीर करून त्यांच्या मालकांवर कठोर आर्थिक दंड
गौहत्या करणाऱ्यांना किमान आजीवन कारावासाची शिक्षा लागू करावी
या मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केल्या जाणार आहेत.
संघटनेचे म्हणणे आहे की ही पदयात्रा गो-संरक्षण आणि धार्मिक मूल्यांच्या जतनासाठी जनजागृतीचे मोठे आंदोलन ठरेल.
