
डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे दूर होत चाललेल्या कौटुंबिक नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी, मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला डिजिटल व्यसनातून मुक्त करण्यासाठी जागतिक स्तरावरील World Digital Detox Day (WDDD) ही मोहीम राबवली जात आहे. जगातील सर्वात मोठा डिजिटल वेलनेस मूव्हमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा जागतिक उत्सव उद्या 10 डिसेंबर रोजी साजरा केला जाणार असल्याची माहिती WDDD च्या संस्थापिका आणि ZEP Foundation च्या अध्यक्षा डॉ. रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोहिमेला महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने अधिकृत पाठिंबा दिल्याने उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर अधिक बळ मिळाले आहे. तब्बल 80 देशांमध्ये WDDD प्रतिज्ञा, जागरूकता कार्यक्रम आणि विविध उपक्रम राबवले जात आहेत.
भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये WDDD उत्साहात साजरा होणार आहे. विद्यार्थी डिजिटल डिटॉक्स प्रतिज्ञा घेऊन या मोहिमेत सहभागी होतील, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस Swan Foundation चे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि प्रसाद भोपळे उपस्थित होते.
पुण्यात उद्या शनिवार वाडा ते शनीपार चौक या मार्गावर सकाळी 8.30 वाजता डिजिटल डिटॉक्स रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त योगेश जवादे तसेच विविध संस्थांचे विद्यार्थी सहभागी होतील.
80 देशांमध्ये WDDD दूतांचे कार्य
शशिकांत कांबळे म्हणाले, WDDD उपक्रमाला जागतिक पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत असून 80 पेक्षा अधिक देशांतील मान्यवर दूत म्हणून कार्यरत आहेत. ZEP Foundation आणि Swan Foundation संयुक्तपणे ही चळवळ जगभर पोहोचवत आहेत.
10500 किमीची भारतभर जनजागृती रॅली
डिजिटल व्यसन रोखण्यासाठी पुढील वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी (20 राज्ये) असा जागरूकता दौरा आयोजित केला आहे. तसेच 1111 Digital Fasting Formula ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
विशेष आभार:
जय गणेश व्यासपीठ, पुणे (पियुष शहा)
सिंहगड परिवार फौंडेशन, पुणे (प्रकाश केदारी व आबा)
अनुराग चारिटेबल ट्रस्ट, पुणे (सुनीता काटम)
हरीभाई देसाई कॉलेज, पुणे (मुख्याध्यापक गुरव सर)
मनपा व खाजगी शाळांचे विद्यार्थी व शिक्षक — विश्रामबाग वाडा क्षेत्र
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (अध्यक्ष सुनील भाऊ रासने)