‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन; ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमास जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. 8 : राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे आयोजन फर्गुसन कॉलेज, पुणे येथे १३ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे. पुण्यात तिसऱ्यांदा हा महोत्सव होत असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचनाची सुदृढ प्रेरणा देण्यासाठी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ९ डिसेंबर २०२५, मंगळवार, सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडणार आहे. या काळात सर्व नागरिकांनी आपापल्या ठिकाणी बसून आवडते पुस्तक वाचून वाचनाचा आनंद घ्यावा, असा हेतू या उपक्रमामागे आहे.

पुणे शहरातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, पुस्तक वाचतानाचा फोटो काढून दिलेल्या क्यूआर कोडद्वारे अपलोड करावा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button