बीडमध्ये ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; गावगुंडांचा धिंगाणा

पुणे दि. 7 : बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटना सतत वाढत असून अशीच धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील नांदगाव येथे ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांना गावगुंडांनी अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुरवसे यांच्या अंगावर गंभीर मारहाणीची वळ उठली असून शरीर काळे-निळे पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. लाथाबुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजते. मात्र ही मारहाण नेमकी कोणत्या कारणास्तव झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.

या घटनेमुळे ग्रामसेवकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button