कात्रज बायपासवर वाहन वेगमर्यादा 40 किमी; नियमभंगावर कठोर कारवाई

पुणे, दि. 4 : कात्रज बाह्यवळण मार्गावरील अतिवेगामुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास लागू केली आहे. मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांच्या अधीन राहून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी हे आदेश जारी केले आहेत.

ही वेगमर्यादा अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांवर लागू राहणार नाही. आदेशानुसार 4 डिसेंबर 2025 पासून ही नवी वेगमर्यादा प्रभावी होणार असून यापूर्वी निर्गमित सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी रस्त्यावरील बोर्ड व चिन्हांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही व स्पीड गनच्या साहाय्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button