मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक; पोलिस तपासाला वेग

पुणे दि. 4 : मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत समोर आलेल्या पुराव्यांवरून तिचा थेट सहभाग स्पष्ट झाल्याने अखेर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला पुण्यातील मोक्याची तब्बल 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत मिळाली होती. या व्यवहारामागे गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे, 300 कोटींच्या व्यवहारात शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनीकडून एक रुपयादेखील न घेता थेट खरेदीखत केल्याचे समोर आले होते. याच संशयास्पद व्यवहारावरून पोलीस त्यांच्या मागावर होते.

या प्रकरणातील पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button