
पुणे दि. 4 : भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग (Tatkal Ticket Booking) प्रणालीतील गैरप्रकार थांबवून खऱ्या प्रवाशांना सहज तिकीट मिळावे यासाठी महत्त्वाचे नवे नियम लागू केले आहेत. हे नियम आधी नोव्हेंबर २०२५ पासून प्रायोगिक स्वरूपात सुरू होते आणि आता सर्व गाड्यांसाठी लागू करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार —
काउंटर तिकीटांसाठी OTP अनिवार्य : आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट घेताना प्रवाशांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP दाखल करावा लागेल. OTP पडताळणी केल्याशिवाय तिकीट कन्फर्म होणार नाही.
ऑनलाइन बुकिंगसाठी Aadhaar लिंक बंधनकारक : १ जुलै २०२५ पासून IRCTC वेबसाइट आणि ॲपवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी वापरकर्त्यांचे खाते आधार कार्डशी लिंक आणि सत्यापित असणे आवश्यक.
आधार-आधारित OTP प्रमाणीकरण : १५ जुलै २०२५ पासून ऑनलाइन तत्काळ बुकिंगसाठी देखील Aadhaar OTP Authentication अनिवार्य.
एजंटना सुरुवातीचे ३० मिनिटे बुकिंग बंद : अधिकृत एजंटना Tatkal Booking विंडो सुरू झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत तिकीट बुक करता येणार नाही —
एसी क्लास – सकाळी १० ते १०:३०
नॉन-एसी क्लास – सकाळी ११ ते ११:३०
या सुधारांमुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिक माहितीसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.