
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि पुणे शहर (पूर्व)चे शहराध्यक्ष तथा आमदार सुनील विजय टिंगरे यांच्या पुढाकाराने पुणे शहर (पूर्व)ची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत कसबा विधानसभा मतदारसंघातून सौ. रुपाली पाटील-तावरे यांची तसेच हडपसर मतदारसंघातून हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
तसेच शहर स्तरावर राकेश राजदे कांबळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जाहीर करताना शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा व प्रगतीशील कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ही टीम सक्रीयपणे काम करेल अशी आशा व्यक्त केली.
नियुक्त पदाधिकार्यांनी आमदार सुनील टिंगरे यांचे आभार मानून, पक्षविस्तार आणि जनसंपर्क उपक्रमांना गती देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे.