अजित पवारांच्या मुलाचा बहारीनमध्ये भव्य पण खाजगी विवाहसोहळा; फक्त 400 पाहुण्यांना आमंत्रण

पुणे दि. 3 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार याचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात बहारीनमध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबाच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केवळ 400 निवडक पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे.

या यादीत राष्ट्रवादी पक्षातून केवळ दोनच वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पक्षातील इतर सर्व मोठे नेते, आमदार आणि खासदारांना निमंत्रण न देण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतल्याचे समजते.

जय पवार आणि त्यांच्या वधूच्या लग्नाची ई-आमंत्रणपत्रिका तसेच कार्यक्रमपत्रिका आता समोर आली असून त्यानुसार बहारीनमध्ये चार दिवसांचा भव्य पण पूर्ण खाजगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमपत्रिका :

४ डिसेंबर : मेहंदी

५ डिसेंबर : हळद, मेहंदी व मुख्य विवाह सोहळा

६ डिसेंबर : संगीत समारंभ

७ डिसेंबर : स्वागत समारंभ आणि रिसेप्शन

राष्ट्रवादीच्या राजकारणात या सोहळ्यामुळे चर्चेला उधाण आले असून हा विवाह कार्यक्रम आता मोठ्या उत्सुकतेचा विषय बनला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button