मुंबईत फडणवीस–राऊत अचानक आमने-सामने; प्रकृतीची केली विचारपूस

पुणे दि. ३ : मुंबईतील एका सामाजिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाली. अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे राऊत विश्रांतीवर असल्याच्या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची खास विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत, डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिले होते. मात्र प्रकृतीत जलद सुधारणा झाल्याने त्यांनी अलीकडच्या काही कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवायला सुरुवात केली आहे.

मंगळवारी मुंबईत राऊत यांच्या व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि राऊत यांच्यात थोडा वेळ चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button