अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी ‘रुपेरी वाळूत’ ; गाण्यामागची खास गोष्ट चर्चेत

पुणे दि. 3 : ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत आणि लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अलिबागच्या मनमोहक समुद्रकिनाऱ्यावर शूट झालेल्या “रुपेरी वाळूत” या गाण्यामागची खास गोष्ट अभिजीतनं नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.

येत्या 5 डिसेंबरला हे गाणं प्रदर्शित होत असून, या गाण्यात अभिजीत आणि गौतमीची केमिस्ट्री प्रथमच पाहायला मिळणार आहे. गायनासोबतच अभिजीतने अभिनयाची जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडली आहे.

२०२५ वर्ष अभिजीत सावंतसाठी विशेष ठरणार आहे. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करताना त्याने अनेक नाविन्यपूर्ण आणि ट्रेंडी प्रोजेक्ट्स हाताळले. अलीकडेच आय पॉपस्टार सारख्या लोकप्रिय शोमध्ये त्याने जेन-झी पिढीसाठी सदाबहार गाण्यांचे नवीन ट्विस्ट देत सादरीकरण केले आणि ते दमदारपणे ट्रेंड झाले.

समुद्रकिनारा, रुपेरी वाळू आणि या दोघांची ग्लॅमरस जोडी – यामुळे हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच मोहित करणार, अशी उत्सुकता आधीच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button