समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम, ताबा मिळवणे संघाचे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पुणे, दि. 3 :
प्रामाणिकपणा हा देशाचा मूलस्वभाव असून तो आपण विसरत चालल्याची खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. “भाजपचे काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे,” अशी टीका त्यांनी केली.

आदरणीय श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित २१ व्या ‘सेवाकर्तव्यत्याग’ सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दि. २ ते ९ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आला असून एस.एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते.

यावेळी रमेश बागवे, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, चेतन अग्रवाल यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले…

गांधींनी भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना रुजवली.आज राजकारणात सेवा नव्हे तर मेवाप्राप्तीची स्पर्धा आहे. काँग्रेसने दिलेले स्वातंत्र्य विसरता येणार नाही. सोनिया गांधी यांनी त्यागाची परंपरा पुढे नेली. राज्यात समता-बंधुता धोक्यात; संविधानावर गदा“मुख्यमंत्र्यांबद्दल कठोर शब्द वापरले, पण माझे मत आजही ठाम!”

उल्हास पवार यांचा भाजपवर हल्ला

“धर्मांधतेचे विष पसरविले जात आहे. इतिहास बदलून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“भाजपकडे सांगण्यासारखे“ काहीच नाही,” असेही ते म्हणाले.

मोहनदादा जोशी यांचे मत

हर्षवर्धन सपकाळ यांनी ६५ पेक्षा अधिक सभा घेऊन कार्यकर्त्यांना नवसंजीवनी दिली. “पंजा” चिन्ह पाच हजार दुचाकींवर लावण्याचा उपक्रम केला. “होय, हे काँग्रेसने केले” मोहीम होर्डिंग्जद्वारे राबविणार. पुणे शहर घडवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश अबनावे यांनी, तर आभार प्रदर्शन गौरव बोराडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button