FFI समारंभात ‘दैवा’ची नक्कल करून रणवीर सिंग अडचणीत; संतापानंतर अभिनेत्याची चाहत्यांकडे माफी

पुणे दि. 2 : गोव्यात झालेल्या 56व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)च्या सांगता समारंभात अभिनेता रणवीर सिंगने उपस्थिती लावली. व्यासपीठावरील मजेशीर वातावरणात तो सहभागी झाला होता. मात्र त्यानंतर रणवीरने केलेल्या कृतीमुळे प्रामुख्याने दाक्षिणात्य प्रेक्षकांकडून संतापाची लाट उसळली.

सांगता सोहळ्यात रणवीर सिंगने अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा चॅप्टर 1’मधील ‘दैवा’ची नक्कल केली. कर्नाटकातील किनारपट्टी भागातील लोकांसाठी ‘दैवा’ आणि चामुंडा देवी हे अत्यंत पूजनीय म्हणून मानले जातात. रणवीरने या अनुकरणादरम्यान “महिला भूत” असा उल्लेख केला, तसेच प्रेक्षकांसमोर दैवाची नक्कल करत डोळे फिरवणे, जीभ बाहेर काढणे अशा हालचाली केल्या. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या, परंतु कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच संताप व्यक्त केला गेला.

हिंदू जनजागृती समितीने (HJS) रणवीरविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली असून देवतांचा चुकीचा संदर्भ देत त्यांच्या पूजनीय भावनांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी रणवीरवर टीका करत “हा अतिरेक आहे” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

अखेर रणवीर सिंगची क्षमा मागणी

सोशल मीडियावर वाढत्या टीकेनंतर रणवीर सिंगने अखेर ऋषभ शेट्टी आणि आपल्या चाहत्यांची माफी मागितली. एका पोस्टद्वारे त्याने कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगत संपूर्ण प्रसंगाबद्दल खेद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button