राज्यात 264 नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी मतदानास सुरुवात; सकाळपासूनच नागरिकांची गर्दी

पुणे दि. 2 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होत असून संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज आहे. निवडणुकीसाठी 12,316 मतदान केंद्रांवर 62,108 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त असून संवेदनशील बूथवर अतिरिक्त सुरक्षा तैनात आहे.

भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, पिंपळगाव, ओझर, इगतपुरी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमने–सामने असून मतदान पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड नगरपरिषदांसाठीही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

एकूण 264 अध्यक्षपदांच्या आणि 6,042 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होत असून मतदानासाठी 17,367 कंट्रोल युनिट आणि 34,734 बॅलेट युनिट्स (EVM) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व मतदान पथके वेळेत केंद्रांवर दाखल झाली आहेत. उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही ठिकाणी निवडणूक निर्णयाविरोधातील अपील प्रलंबित असल्यामुळे 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आज मतदान होणार नाही. त्या ठिकाणी सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button