
पुणे, दि. 1 : भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ – पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित “घरचा गणपती” आणि “गौरी सजावट स्पर्धा २०२५” च्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.प्रास्ताविक करताना द हिंदू फाउंडेशनचे धनंजय जाधव यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, महिला प्रशिक्षण वर्ग, युवकांसाठी स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
आपल्या प्रमुख भाषणात आमदार हेमंत रासने यांनी धनंजय जाधव यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. “गेल्या नऊ वर्षांपासून नगरसेवक नसतानाही ते प्रभागात सातत्याने नागरिकांसाठी काम करतात,” असे ते म्हणाले. गणेशोत्सवात दरवर्षी आयोजित उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून प्रभागातील ४५० पेक्षा अधिक महिला, युवती, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक, पर्यावरण, धार्मिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर आकर्षक, कलात्मक आणि पर्यावरणस्नेही सजावट करण्यात आल्या.
यंदा घरचा गणपती आणि गौरी सजावट या दोन विभागांत अनुक्रमे १५–१५ विजेत्यांची निवड करण्यात आली. पहिल्या क्रमांकाला रु. ७००१/- ते १५व्या क्रमांकाला रु. १५०१/- रोख, ट्रॉफी, साडी आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाला साडी आणि प्रमाणपत्र देणे हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
विजेते —
घरचा गणपती : प्रथम – पूर्वा नितीन शिर्के (नवी पेठ)
गौरी सजावट : प्रथम – शितल सुनील मोहोळ (यशवंत नगर, नवी पेठ)
पारितोषिक वितरण आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच इतर पारितोषिके मा. नगरसेवक राजेश येनपुरे, मा. नगरसेवक धनंजय जाधव, मा. नगरसेविका मनीषा घाटे, स्मिता वस्ते आणि विविध पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
एकूण सुमारे पाच लाख रुपयांची पारितोषिके स्पर्धकांना देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.कार्यक्रमाचे संयोजन द हिंदू फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अमोल दिक्षित यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.