समंथा रूथ प्रभूचं दुसरं लग्न? दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत ईशा योगा सेंटरमध्ये खासगी विवाह सोहळ्याची चर्चा

पुणे दि. 1 : दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यावरपोहचली आहे. समंथानं दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत दुसरं लग्न केल्याच्या अफवा जोरात आहेत. एका खासगी सोहळ्यात दोघांनी लग्न केल्याची चर्चा असून, मात्र समंथा किंवा राज यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

HT सिटीने दिलेल्या माहितीनुसार, समंथा आणि राज निदिमोरू यांनी सोमवारी सकाळी ईशा योगा सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात लग्नगाठ बांधली. अत्यंत खासगी ठेवलेल्या या समारंभाला फक्त 30 पाहुण्यांची उपस्थिती होती. समंथानं लग्नासाठी लाल रंगाची पारंपरिक साडी नेसल्याची माहितीही समोर येते.

समंथाचं पहिलं लग्न साऊथ स्टार नागा चैतन्यसोबत झालं होतं. परंतु त्यांचे वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागा चैतन्यानं पुन्हा लग्न करत अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.

नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं. त्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा रंगल्या.अधिकृत घोषणा येणं बाकी असलं तरी चाहत्यांमध्ये समंथाच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button