सांगोला निवडणुकीत धाडसत्र! शहाजीबापूंचा पालकमंत्र्यावर गंभीर आरोप

पुणे दि. 1 : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक असतानाच सांगोल्यात राजकीय हलचालींना भर पडली आहे. सांगोला शहरातील पाच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून उशिरा रात्री तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. तसेच सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरही पथकाने धाड टाकली.

शहाजीबापू पाटील यांनी गंभीर आरोप करत म्हटले की,
“पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला पराजय निश्चित दिसत असल्याने तयार झालेली भीती ही कारवाईच्या मागे आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौकातील कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत ही तपासणी झाली. मात्र या छाप्यात काय सापडले किंवा कारवाईमागील नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या धाडसत्रामुळे सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे वास्तव स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button