पुण्यात आरपीआय (A) महिला आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी सायली विजय पवारांची नियुक्ती

पुणे दि. 1 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी सायली विजय पवार यांची नियुक्ती शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.
सायली पवार यांना नियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सायली पवार गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधांचे प्रश्न, शालेय साहित्य वाटप, महिला बचत गटांची उभारणी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे.

त्या पदवीधर असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवाजीनगर मतदारसंघात उत्साह निर्माण झाला असून रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी सायली पवारांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास शहर महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button