
पुणे, दि.1 – “भारतातील विविध स्रोतांची उपलब्धता आणि जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे पीसीसीआयचे उद्दिष्ट आहे,” असे प्रतिपादन टोकियोस्थित व्हानेज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. प्रमोद वाहने यांनी केले.प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) यांच्या वतीने आयोजित भारत–जपान बिझनेस मीट 2025 चे उद्घाटन पुण्यात पार पडले.
या प्रसंगी ग्रीन रिन्यूएबल एनर्जी इंक, टोकियो चे सीईओ एन. डोवाकी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच टेक्निकल एक्स्पर्ट सकामोटो, पीसीसीआयचे अध्यक्ष व लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि एम्पेरिया बिल्टकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डाॅ. भगवान गवई, संचालक प्रा. दीपक बागडे, अॅड. ओमप्रकाश मौर्य, जितेंद्रकुमार, जिगर सोसा, राकेश जोशी, राज्याचे माजी सचिव रत्नाकर गायकवाड, सागर अहिवले, कुणाल लोहिया, महेंद्रपाल सिंग, डॉ. प्रकाश पवार, डॉ. गिरीश इंगळे, अविनाश जगताप, डॉ. विजय कदम, संजीवनी गवई, सौरभ गवई, सागरिका गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

“जपानी तंत्रज्ञान + भारतीय स्रोत = आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग” — डॉ. वाहने
डॉ. वाहने म्हणाले,
“भारत आणि जपान या देशांतील सकारात्मक घटकांमध्ये दुवा साधून नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा मानस आहे. कचऱ्यातून हायड्रोजन निर्मिती, पर्यावरणपूरक उत्पादनांचे संशोधन आणि नव्या व्यवसायांच्या संधींवर दोन्ही देशांच्या कंपन्या काम करतील.”हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन हा भविष्यातील मार्ग — एन. डोवाकी
ते म्हणाले,
“ग्रीन टेक स्टार्टअप कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीवर काम करत आहे. भारतातील स्रोतसंपन्नता व उद्योजकीय मनोवृत्ती भविष्यातील हरित उद्योगांसाठी पूरक ठरेल.”पीसीसीआय उद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत — डॉ. भगवान गवईडॉ. गवई म्हणाले,“२५ राज्यांतील उद्योजकांची माहिती विश्लेषित करून, गुंतवणुकीच्या वाटा आणि नव्या तंत्रज्ञानाचा लाभ युवा उद्योजकांना मिळवून देणे हा पीसीसीआयचा मुख्य उद्देश आहे.”
‘ही परिषद केवळ इव्हेंट नाही, तर दीर्घकालीन मेंटरशिपचा मंच’ — विशाखा गायकवाड
त्या म्हणाल्या,“आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, भांडवली गुंतवणूक, स्टार्टअप मार्गदर्शन आणि आर्थिक असमानता कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बागडे आणि डॉ. विजय कदम यांनी केले. आभार प्रदर्शन विशाखा गायकवाड यांनी केले.