नांदेडमध्ये ऑनर किलिंगची थरारक घटना; प्रेयसीने मृतदेहावर हळदी-कुंकू लावून केला विवाह

पुणे दि. 30 : नांदेड शहरातील जुना गंज परिसरात ऑनर किलिंगची हृदयद्रावक घटना घडली असून २२ वर्षीय सक्षम ताटे याची त्याच्या प्रेयसी आंचलच्या कुटुंबीयांनी निर्घृण हत्या केली’

सक्षम आणि आंचल यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र हे नाते वेगवेगळ्या जातीतील असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. गुरुवारी सायंकाळी आंचलचे वडील गजानन मामीलवाड, भाऊ साहिल मामीलवाड आणि इतर साथीदारांनी सक्षमवर जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्या डोक्यावर वार करून त्याला ठार मारण्यात आले.

पोलिस कारवाई:

या प्रकरणी नांदेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंचलचे वडील, भाऊ आणि इतर आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

प्रेयसीची भूमिका:

या घटनेनंतर सक्षमची प्रेयसी आंचलने सर्वांना हादरवणारा निर्णय घेतला. तिने रडवेल्या डोळ्यांनी सक्षमच्या मृतदेहावर हळदी-कुंकू लावून त्याच्याशी लग्न केले. तसेच तिने आपल्या वडील आणि भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून जातीवाद, कुटुंबीयांचा दबाव आणि ऑनर किलिंगची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button