
पुणे दि. 29 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड तसेच 2027 च्या कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारणीच्या सरकारी नियोजनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी या विषयावर आपली ठाम भूमिका जाहीर केली.
सरकारच्या प्रस्तावानुसार साधूग्रामसाठी तपोवन परिसरातील सुमारे 1800 झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयावर पर्यावरणप्रेमींसह राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी टीका करताना म्हटले —
“साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका.”
सरकारने दिलेल्या “दुसरीकडे पाचपट झाडे लावू” या आश्वासनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर एवढी जागा उपलब्ध असेलच, तर साधूग्राम दुसरीकडेच उभारावा, अशी त्यांची मागणी आहे.
सरकारने संघर्षाची भूमिका घेतली, तर मनसे जनता सोबत उभी राहील, असा थेट इशाराही त्यांनी दिला.