फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान! RTO पुणेचा नागरिकांना इशारा

पुणे दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे यांच्या नावाने खोटे ई-चलन प्रलंबित असल्याचे दाखवणारे फसवे SMS व WhatsApp संदेश वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात येत असल्याचे समोर आले आहे. या बनावट संदेशांमध्ये नागरिकांची ओळख तपासण्याच्या नावाखाली “Vahun Parivahan” किंवा अन्य संशयास्पद अॅप डाउनलोड करण्याचा दबाव टाकला जात आहे. अशा संदेशांची तक्रार अनेक वाहनधारकांनी केल्यानंतर ही फसवणूक स्पष्ट झाली आहे.

फसवणुकीच्या हेतूने पाठवले जाणारे संदेश पुढीलप्रमाणे आढळून येतात –
“Dear Vehicle Owner/Driver, This is to inform you that you have been issued a traffic challan… Challan Number: LA21071734311687. To confirm your identity and view the evidence, please install Vahun Parivahan app. Regards, RTO OFFICE”

दरम्यान, RTO पुणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडून जारी होणारा मूळ ई-चलन संदेश हा पूर्णतः वेगळा असतो. RTO कडून पाठवला जाणारा अधिकृत मेसेज पुढीलप्रमाणे आहे –
“MH12XXXXXX was found in public place with violation of MV Act, 1988. Kindly see the notice https://rtomh.in/print?id=xxxxxx
and pay fine amount. – RTO Pune”

RTO पुणे यांनी वाहनधारकांना इशारा दिला आहे की कोणत्याही संशयास्पद मेसेजमधील लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नये. अशा मेसेजकडे त्वरित दुर्लक्ष करावे व हा प्रकार सायबर गुन्हा मानून सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदवावी.

नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील (RTOMH) माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button