नगरपरिषद निवडणुका : २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. २८ : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद तसेच नगरपंचायत मतदारसंघांमध्ये ही सुट्टी लागू राहणार आहे.

कामाकरिता या क्षेत्रांबाहेर असणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू राहील. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदी संस्था यांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

२ डिसेंबर रोजी सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button