
पुणे, दि. २८ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे. त्यानुसार, निवडणूक प्रचाराची मुदत १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपर्यंतच ठेवण्यात आली असून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
प्रचारबंदी लागू झाल्यानंतर
सभा, मोर्चे, जमाव
ध्वनिक्षेपकाचा वापर
निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, प्रसिद्धी किंवा प्रसारण
सर्व गोष्टी तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.