1 डिसेंबरपासून बदलणार 5 महत्त्वाचे नियम; LPG, पेन्शन, कर आणि इंधन दरांवर थेट परिणाम

पुणे दि. 28 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून 1 डिसेंबरपासून देशभरात काही मोठे आर्थिक बदल लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस सिलेंडर, पेन्शन, कर तसेच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतात. दर महिन्याच्या प्रमाणेच या महिन्याही 1 डिसेंबरला 5 महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

1. LPG सिलेंडरचे नवे दर

सरकारी मालकीच्या एलपीजी कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडरचे दर जाहीर करतात. यानुसार 1 डिसेंबरला व्यावसायिक तसेच घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातील.
नोव्हेंबरमध्ये तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक सिलेंडरवर ₹6.50 ची कपात केली होती, मात्र घरगुती सिलेंडरचे दर बदलले नव्हते.

2. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पर्याय निवडण्याची शेवटची तारीख

सरकारी कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक पेन्शन योजना निवडण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पूर्वी ही अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती.
1 डिसेंबरपासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने कर्मचाऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

3. ज्येष्ठ नागरिकांसाठी लाईफ सर्टिफिकेटची अंतिम तारीख

पेन्शन मिळत राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी लाईफ सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक आहे.
लाईफ सर्टिफिकेट न दिल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन थांबण्याची शक्यता आहे.

4. कर आणि गुंतवणूक नियमांत बदल

1 डिसेंबरपासून आयकर किंवा इतर आर्थिक सेवांशी संबंधित काही बदल लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत घोषणा 1 डिसेंबर रोजी अपेक्षित आहे.

5. CNG-PNG दरांमध्ये बदल

1 डिसेंबरपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल जाहीर होऊ शकतात. नोव्हेंबर महिन्यात काही शहरांमध्ये किंमतीत बदल करण्यात आला असल्याने डिसेंबरमध्येही नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button