
पुणे, दि. 27: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशेषत: तिचे पती आणि दिग्दर्शक-निर्माते आदिनाथ कोठारे यांच्याशी नात्यात काही बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
या सर्व तर्क-वितर्कांवर उर्मिलाने अखेर मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अलीकडील एका मुलाखतीत बोलताना तिने सोशल मीडियावरील चर्चांचा आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे सांगितले.
उर्मिला म्हणाली, “सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी विचार करत नाही. त्या चर्चा टॉक्सिक असतात. काही गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या… पण त्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही. माझ्या कामात इतकं व्यस्त असते की कोण काय बोलतंय हे पाहणं मला गरजेचं वाटत नाही.”
तिने पुढे सांगितले की, “प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं नाही. म्हणूनच लोकांनीही सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नये.”
या स्पष्ट विधानानंतर उर्मिलाने तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील सर्व अफवांना अप्रत्यक्षपणे चोख उत्तर दिलं आहे.