
पुणे दि. 26 : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबाग येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे पोलीस दलासह पुणेकर नागरिकांनी या हुतात्म्यांना बँडच्या साथीने आणि शौर्यस्तंभाला मानवंदना देत अभिवादन केले.
कार्यक्रमात ४ हजार ३०० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहीदांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, संजय पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर, कृषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, संदीप भाजीभाकरे, हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, राजाभाऊ कदम, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप तसेच निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सेवा मित्र मंडळाच्या वतीने शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, परग शिंदे, विशाल भोसले, दत्ता मिसाळ, जगदीश शेटे, सुनील जाधव, राजाभाऊ महाडिक यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली.
भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी केले.
चित्रकला स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीश चरवड, संदीप गायकवाड, समीर धर्माधिकारी, नितीन पासलकर, सुधीर लिंगायत, नितीन होले आणि मनोहर देसाई यांनी केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, राहुल आवारे, रामराज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब रायकर, हरिदास चव्हाण आणि पराग ठाकूर यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.
