
पुणे दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशात अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी प्रवेश पोर्टलवर ‘Sent Back’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख व गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील शासकीय वसतिगृह गृहपालांशी संपर्क करून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘Sent Back’ पर्याय निवडून स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्त्वाची योजना असून वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा ती अधिक उपयुक्त ठरणार आहे.