स्मृती मानधना–पलाश मुच्छल लग्न पुढे ढकललं; ‘अनफॉलो’ फोटो व्हायरल पण सत्य काही वेगळंच!

पुणे दि. 26 : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होते. मात्र अचानक हे लग्न पुढे ढकलल्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चांना सुरुवात झाली. त्यातच पलाश मुच्छलच्या काही फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाल्यानंतर चर्चांना आणखी खतपाणी मिळालं.

लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्री-वेडिंग आणि लग्नापूर्वीचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे “दोघांमध्ये नेमकं काय झालं?”, “पलाशने स्मृतीला फसवलं का?” अशा चर्चांना जोर आला. मात्र दोघांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक दावा जोर धरू लागला—स्मृतीने पलाशला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचा. या दाव्याचा एक स्क्रीनशॉटही व्हायरल झाला. मात्र हे सत्य नाही.

या बातमीची पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की व्हायरल झालेला फोटो चुकीचा होता. स्मृती मानधना अद्यापही पलाश मुच्छलला फॉलो करत आहे. तिच्या फॉलोइंग लिस्टमध्ये त्याचे नाव स्पष्टपणे दिसत आहे. तसंच पलाश मुच्छलदेखील स्मृतीला फॉलो करत असल्याचे दिसते.

म्हणून “अनफॉलो” केल्याचा दावा फेक असल्याचे सिद्ध झाले.

दोघांच्या नात्यात नेमका कोणता वाद किंवा गैरसमज झाला आहे याबाबत मात्र अजूनही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. चाहते मात्र या जोडीबद्दलच्या अपडेटसची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button