
पुणे, दि. 21 : भारतातील सर्वात मोठे आणि भव्य डिझाइन प्रदर्शन म्हणून ओळखले जाणारे BRDS डिझाइन प्रदर्शन २०२५ पुण्यात २३ नोव्हेंबर रोजी होत आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मेस्से ग्लोबल अरेना, खराडी येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुलं असणार आहे.
भंवर राठोड डिझाइन स्टुडिओ (BRDS) आयोजित या प्रदर्शनात देशभरातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृती, 3D मॉडेल्स, कॅनव्हासेस, फॅशन डिझाइन्स आणि ललित कलांचा आगळावेगळा संगम पाहायला मिळणार आहे.
देशातील पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, नाशिक, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनौ, इंदूर, नागपूर, अकोला, हैदराबाद, औरंगाबाद आणि जयपूर अशा १५ प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी आयोजित केले जाणारे हे प्रदर्शन आता भारतातील सर्वात व्यापक डिझाइन कार्यक्रम बनले आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे
- डिझाइन शिक्षण जागरूकता
विद्यार्थ्यांना फॅशन, इंटिरियर, उत्पादक डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, ऑटोमोबाईल, फोटोग्राफी आणि ललित कला अशा विविध क्षेत्रांशी परिचित करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट.
- कौशल्य विकास
डिझाइन करिअरमध्ये लागणारी सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यावर भर.
- प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ
५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या कलाकृती, मॉडेल्स, कॅनव्हासेस आणि प्रोजेक्ट्स येथे पाहायला मिळणार आहेत.
विशेष आकर्षण : BRDS करिअर सेमिनार
या कार्यक्रमात BRDS चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. भंवर राठोड यांचे NID, NIFT, NATA आणि UCEED या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी खास मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तसेच, भारतातील 30+ आघाडीची डिझाइन महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना समुपदेशन, करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणार आहेत.
BRDS ने डिझाइन व आर्किटेक्चर प्रवेश प्रशिक्षणात भारतातील नंबर 1 संस्था म्हणून प्रतिष्ठा मिळवली असून, गेल्या 20 वर्षांत 8000 विद्यार्थ्यांना शीर्ष संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.