पुणे ग्रॅंड चॅलेंज सायकलिंग स्पर्धा २०२६; वाहतूक वळविण्याचे आदेश जाहीर

पुणे, दि. 21 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा): पुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ दरम्यान स्पर्धकांची सुरक्षितता आणि मार्गावरील डांबरीकरणाची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ आणि शासनाच्या गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार 20 नोव्हेंबर 2025 ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतूक नियमन लागू राहणार आहे.

काम चालू असलेल्या मार्गांवर सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. संबंधित पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे—

मोरगाव ते मुर्टी रोड काम सुरू असताना वाहतूक:
मोरगाव – लोणीपाटी – लोणी भापकर – पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु) – करंजेपूल – सोमेश्वरनगर या मार्गे वळवली जाईल.

मुर्ती ते चौधरवाडी फाटा रोड कामदरम्यान वाहतूक:
मुर्ती – वाकी – करंजे – सोमेश्वरनगर या मार्गे जाईल.

चौधरवाडी फाटा ते निरा रोड कामदरम्यान वाहतूक:
चौधरवाडी फाटा – करंजे – सोमेश्वरनगर या मार्गे वळविण्यात येईल.

जिल्हादंडाधिकारी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button