कामगार संहितांवर BMS–ABTMM ची संयुक्त भूमिका जाहीर; कंत्राटी कामगारांसाठी ‘समान काम–समान वेतन’ची ठाम मागणी

पुणे, दि. 21 :देशातील चार कामगार संहितांबाबत—वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता व OSH संहिता—भारतीय मजदूर संघ (BMS) आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (ABTMM) यांनी आज आपली एकत्रित भूमिका जाहीर केली. “कामगारांचे हक्क, रोजगार सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा अधिक सक्षम करणे हे आमचे मूलभूत ध्येय आहे,” असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड. अनिल ढुमणे यांनी केले.

या कार्यक्रमाला महामंत्री किरण मिलगीर, ABTMM चे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपाध्यक्ष सुधांशू रानडे व बाळासाहेब भुजबळ उपस्थित होते.

कामगार संहितांचे मुख्य सकारात्मक पैलू
1) वेतन संहिता (Code on Wages)

देशभर एकसमान वेतन व्याख्या

किमान वेतनाचे बळकट संरक्षण

मासिक वेतन 7–10 तारखेला देणे बंधनकारक

बोनस हक्क 8.33% ते 20% पर्यंत निश्चित

2) सामाजिक सुरक्षा संहिता (Social Security Code)

EPF, ESI, Gratuity, Maternity Benefit, Unorganised Workers Welfare सर्व एका चौकटीत

प्रथमच Gig/Platform Workers समाविष्ट

UAN आधारित एकत्रित डेटाबेस

3) OSH Code (Occupational Safety & Health Code)

सुरक्षा व आरोग्यासाठी सुसंगत नियम

महिला कामगारांसाठी रात्रपाळीची मुभा (अटींसह)

प्रवासी कामगार नोंदणी

उद्योग व बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा सुधारणा

4) Industrial Relations Code (IR Code)

युनियन मान्यता प्रक्रिया स्पष्ट

औद्योगिक वाद निराकरण सुसूत्र

कामगारांच्या हक्कांसाठी BMS च्या प्रमुख मागण्या

  1. IR Code मधील 300 कामगार मर्यादा तात्काळ रद्द करा

रिट्रेंचमेंट, ले-ऑफ, क्लोजर परवानगीसाठी मर्यादा 100 वरून 300 झाल्याने रोजगार असुरक्षित.

BMS ची ठाम मागणी : “300 ऐवजी मूळ 100 मर्यादा तात्काळ लागू करा.”

  1. Standing Orders ची मर्यादा — 50 कामगारांपासून लागू करावी

300+ ची मर्यादा अन्यायकारक, बहुसंख्य कामगार वंचित.

युनियन सल्लामसलत बंधनकारक करावी.

सेवा अटी पारदर्शक व कामगारहिताची असावी.

  1. कंत्राटी कामगारांवरील अन्याय थांबवण्यासाठी कठोर धोरण

ABTMM सरचिटणीस सचिन मेंगाळे यांची मागणी :

राष्ट्रीय एकसमान किमान वेतन तात्काळ वाढवावे

वेतन वेळेत, ओव्हरटाईम, सुट्टी हक्क बंधनकारक

“Same Work – Same Worker” तत्त्व कायदेशीर करावे

PF–ESI कव्हरेज सर्वांसाठी

सुरक्षा उपकरणे व आरोग्य नियम कडक पालन

  1. संपावर 60 दिवसांची पूर्वसूचना — कामगार अधिकारांवर मर्यादा

BMS ची भूमिका : “Essential Services सोडून इतर क्षेत्रांत संपाधिकार अबाधित ठेवावा.”

राष्ट्रीय भूमिका (BMS)

रोजगार सुरक्षा

सामाजिक सुरक्षा

वेतन संरक्षण

संघटन स्वातंत्र्य
हे चारही स्तंभ बळकट असावेत, अशी संघटनेची भूमिका.

सचिन मेंगाळे यांचे अधिकृत मनोगत

“देशातील कोट्यवधी कंत्राटी कामगार हे उद्योग व्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे वेतन, सामाजिक सुरक्षा आणि रोजगार स्थैर्य हे तडजोडीचे विषय नाहीत. समान कामासाठी समान वेतन, PF–ESI कव्हरेज आणि कंत्राट बदलले तरी नोकरी सुरक्षित — हीच BMS ची राष्ट्रीय भूमिका आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button