३०वी ज्ञानेश्वर–तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ नोव्हेंबरपासून; विज्ञान–अध्यात्म समन्वयाचा विश्वशांती संदेश

पुणे, दि. २२ नोव्हेंबर :
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि संतश्री ज्ञानेश्वर–तुकाराम स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर–तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. ही व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात, कोथरूड येथे पार पडणार आहे. सर्वांसाठी खुली असलेली ही व्याख्यानमाला विश्वशांती, विज्ञान, अध्यात्म, जनसेवा आणि आधुनिक जीवनशैली यांसारख्या विविध विषयांना स्पर्श करणार आहे.

पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी कार्यक्रमाचे तपशील जाहीर केले. यावेळी डॉ. एस. एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. रत्नदीप जोशी, डॉ. मिलिंद पात्रे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.

उद्घाटन समारंभ – २४ नोव्हेंबर, सायं. ४.०० वा.

उद्घाटनासाठी इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे आणि नवी दिल्लीचे आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी. के. भारद्वाज हे प्रमुख पाहुणे असतील.
कार्यक्रमाध्यक्ष म्हणून विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड उपस्थित राहतील.

व्याख्याने – २५ ते २९ नोव्हेंबर

सायं. ४ वाजता आयोजित व्याख्यानांमध्ये खालील मान्यवर सहभागी :

स्वामी कृष्णा चैतन्य – आधुनिक जीवनपद्धती व अध्यात्म

डॉ. अरविंद नातू – मेडिसीन २५, पारंपरिक ज्ञान व शांतता

काशिनाथ देवधर – संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता

केशव वेल्हाळ – ‘ओम टू क्वांटम कॉम्प्युटिंग’

डॉ. संजय भाटिया – जनसेवेतून विश्वशांती

सकाळच्या कार्यशाळा – ८.४५ ते १२.००

डॉ. संजय उपाध्ये, किंकर विठ्ठल रामानूज, मुकेश खन्ना, डॉ. बी.एस. नागोबा, समिर अंजान, डॉ. ताहेर पठाण, डॉ. जगदीश हिरेमठ अशा अनेक वक्त्यांचे सत्र.

योगासन वर्ग – २५ ते २९ नोव्हेंबर

सकाळी ७ ते ८ या वेळेत शिक्षक व कर्मचार्‍यांसाठी योग वर्ग; मार्गदर्शन – अभय वाघ व अनंत कोंडे.

समारोप – ३० नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता

लेखक विश्वास पाटील प्रमुख पाहुणे, तर डॉ. विवेक सावंत अध्यक्षस्थान भूषवतील.

व्याख्यानमालेचा मुख्य हेतू

“विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातूनच जगात शांतता नांदेल” — स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित ही व्याख्यानमाला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या अध्यात्म–विज्ञानाधारित तत्त्वज्ञानाचे संवर्धन करते.

ही व्याख्यानमाला प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या प्रेरणेने आणि डॉ. राहुल कराड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button