‘छंद सम्राट सामाजिक संस्थेतर्फे युनिक कलेक्शन व कला प्रदर्शनाचे आयोजन’

पुणे : छंदसम्राट सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने बालगंधर्व येथील कलादालनात दोन दिवसीय युनिक कलेक्शन व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध कलाकृती, हस्तकला, शिवकालीन कला, चित्रकला, शिल्पकला, कपड्यांवरील डिझाईन्स, अॅनिमेशन आर्ट यांसह अनेक अनोख्या कलाकृतींचा समावेश असणार आहे.

या उपक्रमात महिलांसाठी रोजगारनिर्मिती, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, तरुण कलाकारांना व्यासपीठ, तसेच लोकसहभाग वाढवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. कलाकार, उद्योजक, विद्यार्थ्यांना आपल्या कलांची मांडणी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उत्तम संधी ठरणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन २३ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येणार असून २३ व २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक कलाकारांना व महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button