अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 19 नोव्हेंबर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध पुण्यातील धायरी परिसरात आणि दौंड येथे संयुक्त कारवाई करत तब्बल 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धायरी फाटा येथे 29.92 लाखांची कारवाई

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (MH 12 VL 0955) वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यातील मोठ्या प्रमाणात मद्य आढळले. यात समाविष्ट:

मॅकडॉवेल नं.1 व्हिस्की 180ml – 288 बाटल्या

रॉयल स्टॅग व्हिस्की 180ml – 192 बाटल्या

इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की 180ml – 240 बाटल्या

एकूण ₹24,04,160 किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) आणि चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान चेतन बाटे यांच्या घरी छापा टाकून:

मद्याच्या प्रत्येकी 144 बाटल्या

गोवा एड्रिएल क्लासिक व्हिस्की 36 बाटल्या

600 बनावट बुचे

192 रिकाम्या बाटल्या

मोबाईल

असा ₹1,18,560 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला.

याच प्रकरणात आरोपी तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या फ्लॅटमधून:

एड्रिएल क्लासिक व्हिस्की 284 बाटल्या

बनावट बुचे 750 नग

मोबाईल

असा ₹4,06,500 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला.

या संपूर्ण धायरी कारवाईत एकूण 5 आरोपी अटकेत असून ₹29,92,220 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

दौंडमध्ये 10.12 लाखांची कारवाई

दौंड येथील स्वामी चिंचोली येथे छापा टाकून:

इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की – 480 बाटल्या

रॉयल स्टॅग व्हिस्की – 240 बाटल्या

मोबाईल

असा ₹8,85,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळी वैभव साळुंखे यांना अटक झाली.

त्यांच्या घरातून:

विविध ब्रँड्सच्या 432 बाटल्या

बनावट लेबल्स – 1300 नग

असा ₹1,27,300 किमतीचा साठा जप्त झाला.

दौंड कारवाईत 3 आरोपी अटकेत असून एकूण जप्ती ₹10,12,900 इतकी आहे.

उत्पादन शुल्क विभागाची पुढील कारवाई सुरूच

या दोन्ही प्रकरणांचा तपास निरीक्षक सचिन श्रीवास्तव (डी विभाग, पुणे) व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक (दौंड विभाग) करत आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाई आणखी जोरात सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले.

नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
टोल फ्री: 1800 233 9999
दूरध्वनी: 020 – 26058633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button